Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » राष्ट्रपतींची ऐतिहासिक जानकी मंदिराला भेट

राष्ट्रपतींची ऐतिहासिक जानकी मंदिराला भेट

Indian President Pranab Mukherjee is welcomed to the Janaki Temple in Janakpurdham, on Friday, November 04, 2016. Photo: RSS

जनकपूर, [४ नोव्हेंबर] – नेपाळच्या दौर्‍यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज शुक्रवारी येथील ऐतिहासिक जानकी मंदिराचे दर्शन घेतले. भारताच्या सीमेला लागून असलेल्या या ऐतिहासिक शहरात पर्यटकांना भारतातर्फे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासोबतच दोन धर्मशाळा बांधण्याची ग्वाही राष्ट्रपतींनी यावेळी दिली.
गेल्या १८ वर्षांच्या काळात नेपाळला भेट देणारे पहिलेच राष्ट्रपती ठरलेले प्रणव मुखर्जी यांनी नेपाळ दौर्‍याच्या आपल्या शेवटच्या दिवशी जानकी मंदिरात विधिवत पूजा केली. येथील पुजार्‍यांनी शांती मंत्रांनी त्यांचे स्वागत केले.
या ऐतिहासिक आणि प्राचीन शहरात पर्यटकांना येणे शक्य व्हावे यासाठी परिक्रमा पथ आणि दोन धर्मशाळा बांधण्याची घोषणा मी भारत सरकारच्या वतीने करीत आहे. जनकपूर आणि भारतातील अयोध्या या दोन शहरांमधील कराराने दोन्ही देशांचे आणि नागरिकांचे संबंध आणखी मजबूत होतील आणि व्यापार व पर्यटनाला चालना मिळेल, असा माझा विश्‍वास आहे. माझी ही भेट अविस्मरणीय आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google