Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या दिवाळीच्या शुभेच्छा

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या दिवाळीच्या शुभेच्छा

pranav-modiनवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अंधारावर मात करणारा हा प्रकाशाचा सण सर्वच नागरिकांच्या आयुष्यात आशा आणि समृद्धीचा प्रकाश घेऊन येईल, असा विश्‍वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
आपले भविष्य उज्ज्वल करण्याची भावना मनात जागृत करणारा हा सण आहे. असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा विजय असेच या सणाचे महत्त्व आहे, असेही राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ही दिवाळी सर्व देशवासीयांना सुखाची आणि समृद्धीची जावी, हीच माझी मनोकामना असल्याचे त्यांनी ट्विटरवर नमूद केले.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google