Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर संसदेत चर्चा घडवा: पंतप्रधान

राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर संसदेत चर्चा घडवा: पंतप्रधान

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर –
modi-parliament1राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर संसदेत ठोस आणि प्रामाणिक चर्चा घडवून आणण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. संसदेच्या हिवाळी अधिवेेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते.
या बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, सांसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे, जदयुचे शरद यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देतांना संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार म्हणाले की, गोंधळ घालून सभागृहाचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याऐवजी राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर चर्चेची सरकारची तयारी आहे. निवडणुकीसाठी सरकारने निधी देण्याच्या तसेच लोकसभा तसेच राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे अनंतकुमार यांनी सांगितले. नोटबंदीच्या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्याचे आवाहन मोदी यांनी बैठकीत केल्याचे अनंतकुमार यांनी स्पष्ट केले.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. काळ्या पैशाला आमचाही विरोध आहे, मात्र सरकारने घाईगर्दीने आणि पुरेशी तयारी न करता हा निर्णय घेतला, त्यामुळे जनतेला अतिशय त्रास होत असल्याचा आरोप आझाद यांनी यावेळी केला.  स्वातंत्र्योत्तर भारतातील हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही आझाद यांनी केला. अधिवेशनात सर्व विरोधक एकत्रितपणे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 16 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google