Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » राहुल गांधींनी कॉंग्रेसची धुरा सांभाळावी

राहुल गांधींनी कॉंग्रेसची धुरा सांभाळावी

=पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांचे प्रतिपादन=
narayanasamy-rahulनवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – राहुल गांधी यांना पक्षाचे सर्वोच्च पद देण्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ. त्यांनी पक्षप्रमुख म्हणून पदभार सांभाळला पाहिजे. राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची वेळ आता आलेली आहे, असे प्रतिपादन पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी आज येथे केले.
भाजपात नुकत्याच प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा यांनी खा. राहुल गांधींवर नुकतीच टीका केली आहे. या पृष्ठभूमीवर नारायणसामी यांच्या वक्तव्याकडे बघितले जाते.
वृत्तसंस्थेशी बोलताना नारायणसामी म्हणाले, सोनिया गांधी या आमच्या पालक असून पुढेही त्या आमच्या पालकच असतील! राहुल गांधी पक्षवाढीसाठी फार मेहनत करीत आहेत. कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर त्यांनी अतिशय कष्ट घेतले आहेत. देशभरातील लोकांना ते भेटत आहेत.
पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यासोबत आपले कुठलेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले. नारायणसामी म्हणाले, मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल या नात्याने आम्ही दोघेही घटनेच्या चौकटीत राहूनच कार्य करीत आहोत.
सर्जिकल स्ट्राईकबाबत विचारता ते म्हणाले, लष्कराच्या कारवाईतून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत आहेत. या मुद्दावर राजकारण होता कामा नये.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google