Home » उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राज्य, राष्ट्रीय » रिटा बहुगुणा भाजपात; कॉंग्रेसला जबर हादरा

रिटा बहुगुणा भाजपात; कॉंग्रेसला जबर हादरा

rita-bahuguna-joshi-joins-bjp

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [दि. २० ऑक्टोबर] – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला गुरुवारी जबर धक्का बसला. राज्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
११ अशोका रोड या भाजपा मुख्यालयात रिटा बहुगुणा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवून आणल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करून, रक्ताच्या दलालीचा आरोप केल्याबद्दल कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
राष्ट्र आणि उत्तरप्रदेशचे हित लक्षात लक्षात घेऊन कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. आजच आमदारकी आणि कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असे स्पष्ट करत रिटा बहुगुणा म्हणाल्या, माझ्या सार्वजनिक जीवनातील २८ वर्षांपैकी २४ वर्षे मी कॉंग्रेसमध्ये होते. मात्र गेल्या दिवसांतील घटनांमुळे मी व्यथित झाले. कॉंग्रेसमध्ये माझा जीव गुदमरू लागला.
सोनिया गांधी संघटनात्मक मुद्दे समजून घ्यायच्या, पक्षातील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांना भावना ऐकायच्या, पण राहुल गांधींच्या काळात हे सर्व बंद झाले, याकडे लक्ष वेधत रिटा बहुगुणा जोशी म्हणाल्या की, राज्यात कॉंग्रेस पूर्णपणे निष्क्रिय झाली आहे, त्यामुळेच पक्षाला प्रशांत किशोर यांची मदत घ्यावी लागली. आज राज्यातील कॉंग्रेस प्रशांत किशोर यांच्या इशार्‍यावर चालत आहे. कोणत्या नेत्याने कुठे जायचे, हे तेच ठरवतात. अमित शाह यांची प्रशंसा करताना त्यांनी ते खुल्या दिलाचे आहेत, अशी टिप्पणी केली. पक्ष देईल ती जबाबदारी त्या प्रामाणिकपणे पार पाडणार आहेत.
रिटा बहुगुणा या कॉंग्रेसचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या कन्या आहेत. त्यांचे बंधु आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी याआधीच भाजपात प्रवेश केला आहे.

शेअर करा

Posted by on Oct 21 2016. Filed under उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राज्य, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google