Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » लोकसभा सभापतींवर भिरकावले कागदाचे तुकडे

लोकसभा सभापतींवर भिरकावले कागदाचे तुकडे

⇒विरोधकांचे अशोभनीय वर्तन
⇒दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर –
papers-thrown-at-sumitra-mahajanनोटबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी आज संसदेत अतिशय अशोभनीय वर्तन केले. संसदेत गदारोळ करून आज गुरुवारी सातव्या दिवशीही कामकाज होऊ दिले नाही. विरोधकांनी नोटबंदीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आग्रह धरला असता, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी ही मागणी फेटाळल्याने सपाचे खासदार अक्षय यादव यांनी  त्यांच्यावर कागदांचग तुकडे भिरकावले. यामुळे वातावरण चिघळले. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील विरोधकांचा गदारोळ न थांबल्याने अखेर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी  लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी नियमानुसार कामकाज पुकारले. मात्र विरोधी पक्षांचे सदस्य नोटबंदीच्या निर्णयावर चर्चा घ्या, असा आग्रह करीत होते. सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. त्यावर पुन्हा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अखेर महाजन यांनी लोकसभेचे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.
या घोषणेनंतर त्या जेव्हा आपल्या आसनावरून उठून निघून जात होत्या, त्याचवेळी सपा खासदार अक्षय यादव यांनी त्यांच्यावर कागदाचे तुकडे फेकले. यादव यांच्या या कृत्यामुळे सत्ताधारी पक्षाचे सदस्य चांगलेच संतापले.  अक्षय यादव यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज प्रथम दुपारी  १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. १२ वाजल्यानंतर लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. मात्र, विरोधकांचा गोंधळ कायमच होता. परिणामी, लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री रामनरेश यादव यांच्यासह प्रख्यात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांच्या निधनाची सूचना सदस्यांना दिली.
काबूल येथे मशिदीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांबाबत शोक व्यक्त केला. यानंतर संसदेतील सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहात श्रद्धांजली अर्पण केली.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google