Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन

वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन

♦तुमची हिंमत होईल का?
♦शिवसेना खासदारांना पंतप्रधानांचे बाणेदार उत्तर,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर
narendra-modi3नोटाबंदीच्या निर्णयाचे आधी स्वागत आणि आता विरोध करणार्‍या शिवसेना खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चांगलेच सुनावले. ‘जेव्हा मी वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन की, मी चांगलं काम करून आलो आहे, तुमची हिंमत होईल का, माहीत नाही,’ अशा बाणेदार शब्दात पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना उत्तर दिले..
नोटाबंदीच्या मु्‌द्यावर पक्षाचा विरोध व्यक्त करण्यासाठी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी पंतप्रधानांची भेट घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांचे म्हणणे अगदी शांततेत ऐकून घेतले आणि नंतर त्यांचा अतिशय खरपूस समाचार घेतला. मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन की, मी चांगले काम करून आलो आहे. तुम्ही कितीही विरोध केला तरी तुम्हाला आमच्यासोबतच यावे लागणार आहे, दुसरा उपायच नाही, असेही मोदी म्हणाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर काही दिवसांतच पक्षाच्या खासदारांनी या निर्णयाविरोधात दंड थोपटले.
तर बाळासाहेबांनाही आनंद होईल : उद्धव
पंतप्रधान मोदी यांचे नोटाबंदीवर बाणेदार उत्तर ऐकून उद्धव ठाकरे काही प्रमाणात नरमले असल्याचे जाणवत आहेत. ते म्हणाले की, देशात चलन प्राप्त करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. मी वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन, असे मोदी म्हणाले असतील, तर त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. बाळासाहेबांबद्दल त्यांच्या मनात आदर असल्याचेच यावरून दिसून येते. पण, सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे देणे, देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित आहे. ती उत्तरे सर्वसामान्यांना मिळाली आणि त्यांचे जीवनमान सुरळीत झाले, तर बाळासाहेबांना देखील जास्त आनंद होईल.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google