Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » वस्तूंवरील बहिष्काराचा परिणाम गुंतवणुकीवर पडेल

वस्तूंवरील बहिष्काराचा परिणाम गुंतवणुकीवर पडेल

=चीनचा भारताला इशारा=
ban-chinaनवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – दिवाळी सणाच्या काळात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन देशाच्या कानाकोपर्‍यातून करण्यात येत असल्याने चीनने चांगलीच धास्ती घेतली आहे. अशा कोणत्याही मोहिमेचा चीनकडून भारतात जाणार्‍या गुंतवणुकीवर तसेच व्यावसायिक व द्विपक्षीय संबंधावर प्रतिकूल परिणामच होणार आहे, असा इशारा चीनने आज गुरुवारी दिला.
भारतात आमच्या वस्तूंवर कितीही बंदी घालण्यात आली, तरी आमच्या निर्यातीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण, आमच्या वस्तूंना दुसरा पर्यायच उपलब्ध नसल्याने या मोहिमेचा सर्वात मोठा फटका भारतीय व्यापारी व ग्राहकांनाच बसणार आहे. वस्तूच्या पुरवठ्यात चीन हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे आणि गेल्या वर्षी आम्ही २२७६.५ अब्ज डॉलर्स इतक्या निर्यातीचे लक्ष्य गाठले होते, असे चीनच्या दिल्लीतील दूतावासाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
चीन जगभरात वस्तूंची जितकी निर्यात करते त्यात भारताचा वाटा दोन टक्के आहे. त्यामुळे भारताच्या सर्वच राज्यांमध्ये चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आला, तरी आमच्या निर्यातीवर त्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google