Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » वाढदिवसानिमित्त अडवाणी यांना मान्यवरांच्या शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त अडवाणी यांना मान्यवरांच्या शुभेच्छा

advani_l_kतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा ८८ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त अडवाणी यांचे अभिष्टचिंतन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अडवाणी यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहही होते. तत्पूर्वी  मोदी यांनी आज ट्विट करून, अडवाणी आमचे प्रेरणास्रोेत आणि अतिशय तळमळीने देशाची सेवा करणार्‍या ज्येष्ठ नेत्यातील एक असल्याचे म्हटले. वाढदिवसानिमित्त अडवाणी यांना माझ्या शुभेच्छा. त्यांना उत्तम स्वास्थ आणि दीर्घायु लाभो, असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
गृहमंत्री राजनाथसिंह, कायदा मंत्री रविशंकरप्रसाद, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी अडवाणी यांना वाढविदसाच्या शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google