Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » विमाधारकांना प्रीमिअम भरण्यासाठी ३० दिवसांची मुदत

विमाधारकांना प्रीमिअम भरण्यासाठी ३० दिवसांची मुदत

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर –
irda-logoनोटबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांजवळ रोख रकमेचा तुटवडा असल्याचे लक्षात घेऊन भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने उदार धोरण स्वीकारले आहे. विमा कंपन्यांनी आपल्या सर्व विमाधारकांना प्रीमिअम भरण्यासाठी अतिरिक्त ३० दिवसांचा अवधी द्यावा, असे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.
५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतानाच सरकारने बँकांमधून पैसे काढण्यावरही मर्यादा घातली आहे. एक व्यक्ती आठवड्यातून केवळ २४ हजार रुपयेच काढू शकतो. यामुळे लोकांच्या हातात मोजकाच पैसा असल्याची दखल प्राधिकरणाने घेतली. याच अनुषंगाने जीवन विमा परिषदेने प्राधिकरणाकडे धाव घेतली आणि देशभरातील सर्वच विमाधारकांना ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतील आपला प्रीमिअम भरण्यासाठी ३० दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात यावी, अशी विनंती केली.
परिषदेची भूमिका ऐकून घेतल्यानंतर आणि देशभरातच नागरिकांची पैशाअभावी गैरसोय होत असल्याचे लक्षात घेत, प्राधिकरणाने विमा कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना प्रीमिअम भरण्यासाठी ३० दिवसांचा अतिरिक्त अवधी द्यावा, असे निर्देश दिले. जवळ पैसेच नसल्यामुळे विमा ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीचे नुकसान टाळता यावे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकार्‍याने सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google