Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » विरोधकांचा आजचा ‘भारत बंद’ रद्द

विरोधकांचा आजचा ‘भारत बंद’ रद्द

•जनतेच्या रेट्यापुढे कॉंग्रेसची माघार
••जदयूचा पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा
•नोटबंदीवरून विरोधकांनी केली होती आक्रोशाची घोषणा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर –
bharat-band-cancelledबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नोटबंदीचे समर्थन केल्याने जदयूने या आंदोलनातून अंग काढून घेतले. तर, हा केवळ आक्रोश असून, भारत बंद नाही, असे कॉंगे्रसने स्पष्ट केले. नोटबंदीच्या निर्णयावरून मागील संपूर्ण आठवडा संसदेची कोंडी केल्यानंतर विरोधकांनी देशव्यापी आक्रोशाची घोषणा केली होती.
५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात विरोधकांनी उद्या सोमवारी देशव्यापी ‘आक्रोश’ दिन पुकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धमक्यांच्या राजकारणावर विश्‍वास असल्याने आम्हीही त्यांना सोमवारी जोरदार धक्का देणार आहोत. या आक्रोशाच्या माध्यमातून मोदींना संघटित विरोधकांची ताकद दिसणार आहे, असे विरोधकांनी जाहीर केले होते. जदयूने केवळ देशव्यापी आक्रोशमधूनच नव्हे, तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात होणार्‍या धरणे आंदोलनातूनही माघार घेतली आहे.
आम्ही केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले असताना, आमचा पक्ष उद्याच्या आक्रोशमध्ये आणि ममतांच्या नेतृत्वातील धरण्यांमध्ये कसा सहभागी होऊ शकतो, अशी भूमिका बिहार जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी बोलताना मांडली. सोमवारच्या आक्रोश आंदोलनाबाबत पक्षाने कोणती भूमिका घ्यायला हवी, याबाबत जदयूच्या वरिष्ठ नेत्यांची शनिवारी बैठक झाली होती.
दरम्यान, कॉंगे्रसने मात्र हा केवळ आक्रोश असून, सोमवारी भारत बंद नाही, असे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करता न आल्यानेच व अपयश झाकण्यासाठी त्यांनी नोटबंदीचा निर्णय घेतल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google