Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » व्यापारीकरण न करता शाळा उघडणार: बाबा रामदेव

व्यापारीकरण न करता शाळा उघडणार: बाबा रामदेव

ramdev-baba-1लखनऊ, [१२ नोव्हेंबर] – ‘माझे कार्य देशासाठी आहे. मी जे बोलतो तेच करतो. आता शिक्षणाचे व्यापारीकरण न करता शाळा उघडण्यात येईल. मुलांना सुसंस्कार व मूल्यांसोबत तंत्रज्ञानाचे शिक्षणसुद्धा मिळायला पाहिजे’, असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले.
‘हिंदुस्थान शिखर संमेलन-२०१६’ मध्ये शनिवारी येथे आयोजित प्रश्‍नोत्तर कार्यक्रमात ते बोलत होते.
रामदेव बाबा पुढे म्हणाले, मी योगी आहे, कर्मयोगी आहे. मात्र, तत्पूर्वी मी लोकांसाठी किती उपयोगी आहे, यावर चर्चा व्हायला हवी. संन्यासी जनतेसाठी कार्य करतो याबाबत सकारात्मक प्रचार व्हायला हवा. कुणीही अपप्रचार करू नये, असे ते म्हणाले.
काळा पैसा बाहेर यावा व भ्रष्टाचार संपावा, असे सर्वच राजकीय पक्षांना वाटते. दोन हजारांच्या नोटा एकतर आणूच नयेत आणि आणल्यानंतर त्याचा पुरेसा वापर व्हायला हवा. कारण त्यामुळे दहशतवाद व नक्षलवादाला मोठ्या चलनाच्या रूपात पैसा मिळतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी नवीन नोटांसंदर्भात व्यक्त  केली.
विदेशातील काळापैसा केव्हा देशात येईल? या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जेव्हा आपला देश बलशाली होईल, तेव्हा हा काळापैसाही परत येेईल.
आपण ‘पतंजली’ची भागीदारी एक लाख कोटी रुपयांची करू इच्छितो. कंपनीचा १०० टक्के नफा धर्मदाय कार्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात योगदान म्हणून ५०० पेक्षा अधिक शाळा उभारल्या जातील. या शाळेत गायींवरही संशोधन केले जाईल, असे बाबा रामदेव यांनी सांगितले. पतंजली देशातील शेतकर्‍यांसाठी काम करीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google