Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी

=ओबामांनी प्रथमच केले दीपप्रज्वलन=
obama-diwali-leadवॉशिंग्टन, [३१ ऑक्टोबर] – निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रविवारी व्हाईट हाऊसमधील आपल्या ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. ओबामांनी प्रथमच या कार्यालयात दीप प्रज्वलित केला आणि या पदावर विराजमान होणारे नवे राष्ट्राध्यक्ष ही परंपरा कायम राखतील, अशी आशा व्यक्त केली.
बराक ओबामा यांनी सर्वप्रथम २००९ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणारे ते अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले होते. रविवारी त्यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात प्रथमच दिव्यांची आरास केली. या दिवाळी महोत्सवात अमेरिकन आणि भारतीय कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
२००९ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणारा अमेरिकेचा मी पहिलाच राष्ट्राध्यक्ष ठरल्याचा मला अभिमान आहे. एका दिवाळीत मी आणि पत्नी मिशेल मुंबई दौर्‍यावर असताना भारतीयांकडून आमचे झालेले स्वागत आम्ही कधीच विसरू शकत नाही, असे ओबामा यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले.
ओव्हल कार्यालयात प्रथमच दीप प्रज्वलित करताना मला आनंद झाला. अंधारावर नेहमी प्रकाशाचा विजय होतो, याचेच हा दीप प्रतीक असतो. ही दिवाळी अमेरिकन आणि येथे राहणार्‍या भारतीयांना सुखाची व समृद्धीची जावो, हीच शुभेच्छा मी देत आहो. माझ्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये येणारे राष्ट्राध्यक्ष हीच परंपरा कायम राखतील, असा मला विश्‍वास असल्याचे ओबामांनी यांनी म्हटले आहे. दरम्यान, ओबामा यांचे हे फेसबुक पोस्ट रात्रभरात दीड लाखावर लोकांनी लाईक केले असून, ३३ हजारावर लोकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google