Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » व्हिसा एजंटला जोधपूरमध्ये अटक

व्हिसा एजंटला जोधपूरमध्ये अटक

=पाक उच्चायोगातील हेरगिरी रॅकेट=

New Delhi : Arrested Jodhpur-based passport and visa agent Shoaib allegedly involved in the espionage ring run by a Pakistani High Commission official brought at Delhi Crime Branch office in New Delhi on Friday.PTI Photo by Subhav Shukla(PTI10_28_2016_000031B)

New Delhi : Arrested Jodhpur-based passport and visa agent Shoaib allegedly involved in the espionage ring run by a Pakistani High Commission official brought at Delhi Crime Branch office in New Delhi on Friday.PTI Photo by Subhav Shukla(PTI10_28_2016_000031B)

नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – पाकिस्तानच्या राजधानी दिल्लीतील उच्चायोगातील काही अधिकार्‍यांकडून चालविण्यात येत असलेल्या हेरगिरी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या पासपोर्ट आणि व्हिसा एजंटला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री राजस्थानच्या जोधपूर येथे बेड्या ठोकल्या.
पाकच्या उच्चायोगात भारतविरोधी हेरगिरी रॅकेट चालविले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी उच्चायोगातील अधिकारी मेहमूद अख्तरसह दोन भारतीय हेर मौलाना रमझान आणि सुभाष जहांगीरला अटक केली होती. तर, व्हिसा एजंट शोएब हा पळ काढण्यात यशस्वी ठरला होता.
तो जोधपूरकडे पळाला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची काही पथके तातडीने रवाना झाली होती. त्याच्या हालचाली टिपल्यानंतर गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली आणि दिल्लीत आणण्यात आले, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मेहमूद अख्तरला गुरुवारीच पर्सोना नॉन गॅ्रटा जाहीर करून ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. तर, रमझान आणि जहांगीरला १२ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. विशेष म्हणजे, पाकच्या हेरगिरी रॅकेटमध्ये या दोघांनाही शोएबनेच नियुक्त केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google