Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » शक्तिशाली भूकंपाचे जपान हादरले

शक्तिशाली भूकंपाचे जपान हादरले

=६.२ इतकी तीव्रता, त्सुनामीचा धोका नाही=
japan-earthqueck-oct16टोकियो, [२१ ऑक्टोबर] – जपानचा पश्‍चिमेकडील भाग आज शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.२ इतकी होती, अशी माहिती अमेरिकन भूगर्भशास्त्र विभागाने दिली. तथापि, यामुळे त्सुनामीचा कुठलाही धोका निर्माण झाला नाही.
आज पहाटेच्या दोनच्या सुमारास टोटोरी भागात जमिनीच्या सुमारे १० किलोमीटर आत भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सुरुवातीला या धक्क्याची तीव्रता ६.६ इतकी नोंदविण्यात आली होती. तथापि, नंतर ती ६.२ असल्याचे जाहीर करण्यात आले.
युरिहामा शहरात काही घराची पडझड झाली असून, काही ठिकाणी आग लागल्याचेही वृत्तात म्हटले आहे. कुरायोशी शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यात काही लोक जखमी झाले, स्थानिक अधिकार्‍यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भूकंपामुळे अनेक रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्याचेही टीव्ही वाहिन्यांनी दाखवले. वीज पुरवठाही खंडीत झाला असून,  सुमारे ४० हजारावर घरे अंधारात आहेत. या भागातील बुलेट ट्रेनची सेवाही ठप्प झाली आहे. अणुभट्टी देखील तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.
याच वर्षीच्या एप्रिलमध्ये जपानच्या ईशान्य किनारपट्टीला महाविनाशी भूकंपाचा धक्का बसला होता. यात १७०० लोकांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता झाले होते. तर मार्च २०११ मधील भूकंपाने त्सुनामीच्या लाटा उफाळून १८ हजारावर लोक ठार झाले होते.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google