Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » शरियानुसार बँकिंग सेवा; रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव

शरियानुसार बँकिंग सेवा; रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर –
rbiदेशात सध्या चलन तुडवडा असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याज मुक्त बँकिंग सेवा पुरविण्यासाठी शरियानुसार बँक व्यवहार सुरू करावेत, असा प्रस्ताव मांडला आहे.
देशातील बँकांनी आपल्या शाखेत ‘इस्लामिक खिडकी’ला स्थान द्यावे, असे प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक बर्‍याच दिवसांपासून इस्लामिक बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडे इस्लामिक बँकिंगचा प्रस्ताव पाठवल्याचे समोर आले आहे.
रिझर्व्ह बँकेने शरिया बँकिंगचा प्रस्ताव मांडल्याची माहिती वृत्तसंस्थेला माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरिया बँकिंग सुविधा सुरू करण्यासंदर्भात आरबीआयने अर्थ मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. या पत्रात आरबीआयने इस्लामिक वित्तीय गुंतागुंत आणि शरिया बँकिंग विषयातील आव्हानांचा भारतीय बँकिंग क्षेत्राला अनुभव नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पण, हळूहळू ही बँकिंग सेवा व्यवहारात आणली जाऊ शकते, असेही आरबीआयने म्हटले आहे. अनुभवानुसार यामध्ये व्यापकता आणता येऊ शकते, असे रिझर्व्ह बँकेला वाटते. इस्लाममधील शरियानुसार अर्थिक व्यवहारात व्याजाची वसुली करण्यास मान्यता नाही.
देशात व्याजमुक्त बँकिंग व्यवस्था सुरू करायची झाल्यास  इस्लामधील शरियानुसार व्यवहार करावे लागतील. व्याजमुक्त बँकिंग अन्य फंडामध्ये होऊ नयेत यासाठी व्याजमुक्तीसाठी स्वतंत्र खिडकी उघडावी लागेल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. आरबीआयने मांडलेला हा प्रस्ताव अतर्ंगत विभागातील शिफारशींच्या आधारावर बनविण्यात आला असून भारतात इस्लामिक बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी कायदे आणि नियमांची देखील चाचपणी करण्यात आली आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर बँकिंग क्षेत्राला काय फायदा होईल यासंबंधी देखील आरबीआयने विश्‍लेषण अहवाल अर्थ मंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google