Home » ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » शिवराजसिंह चौहान यांची मुख्यमंत्रिपदाची ११ वर्षे पूर्ण

शिवराजसिंह चौहान यांची मुख्यमंत्रिपदाची ११ वर्षे पूर्ण

=अडवाणींबद्दल आम्हा सर्वांनाच आदर : शिवराजसिंह=
वृत्तसंस्था
भोपाळ, २९ नोव्हेंबर –
shivrajsingh-chuhanमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराजसिंह चौहान यांनी आज मंगळवारी आपला ११ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपातील प्रत्येकाच्याच मनात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी प्रचंड आदर आहे, असे प्रतिपादन चौहान यांनी केले.
अडवाणी हे आमचे आदरनीय नेते आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे माझ्यासारखा सामान्य नेता इतका सक्षम झाला आहे, असे शिवराजसिंहांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोलिसांनी सिमीच्या ज्या अतिरेक्यांना चकमकीत ठार मारले होते, त्यांच्याकडे केवळ कैदी म्हणून पाहू नका. ते अतिरेकी होते. पळ काढण्यात जर त्यांना यश आले असते, तर कितीतरी निष्पाप लोकांचा बळी गेला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google