Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » शिवसेना-भाजपाची युती पक्की

शिवसेना-भाजपाची युती पक्की

=राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवणार=
bjp-shivsena-1हिंदुस्थान समाचार,
मुंबई, दि. २७ ऑक्टोबर- दिवाळीच्या मुहूर्तावर शिवसेना-भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली.
‘शिवसेना आणि भाजपची युती व्हावी ही मतदारांची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही राज्य पातळीवर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीसंबंधी दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी स्थानिक नेत्यांना युती करण्याच्या सूचना दिल्या आहेत,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे. तर, ‘भाजप आणि शिवसेनेत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये युती केली जाईल. यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. जर अडचण आलीच, तर तो प्रश्न राज्य पातळीवर सोडवला जाईल. या युतीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आनंद झाला,’ असे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना आणि भाजपकडून राज्यभरातील नगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढवल्या जातील, हे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मुंबई, ठाण्यातील महानगरपालिका निवडणुकीबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. गुरुवारी दिवसभर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक पदाधिकार्‍यांना विेशासात घेऊन जागावाटपाचा निर्णय घेण्यात येईल. या जागावाटपात जिल्हा प्रमुखांना अधिकार देण्यात येतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युतीसाठी गुरुवारी दिवसभर सकारात्मक हालचाली सुरू होत्या. युतीची चाचपणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठक झाली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रावसाहेब दानवे यांच्यात फोनवरूनदेखील चर्चा  झाली. गुरूवारी सकाळी खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा केली होती. भाजपने शिवसेनेशी युती करण्यासाठी सुरूवातीपासून सकारात्मकता दाखवली होती.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google