Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » श्याम नारायण चौकसे यांच्या याचिकेवर राष्ट्रगीताचा निर्णय

श्याम नारायण चौकसे यांच्या याचिकेवर राष्ट्रगीताचा निर्णय

वृत्तसंस्था
भोपाळ, १ डिसेंबर –
shyam-narayan-choukseyचित्रपट सुरू होण्यापूर्वी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजविले पाहिजे आणि त्यावेळी सर्वांनी स्तब्ध उभे राहिले पाहिजे, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर, त्याचे सर्वत्र स्वागतच करण्यात आले. कालपर्यंत फारसे परिचित नसलेल्या, परंतु, ज्यांच्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला, ते मात्र आता प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. भोपाळनिवासी श्याम नारायण चौकसे यांच्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे.
७६ वर्षीय चौकसे, केंद्रीय वखार महामंडळातून अभियंता म्हणून २००० साली निवृत्त झाले आहेत. निवृत्तिपश्‍चात त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला गुंतवून घेतलेे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रहित गांधीवादी मंच नावाची एक गैरसरकारी संस्था स्थापन केली आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवावे, या याचिकेचा पाठपुरावा करण्याशिवाय, पर्यावरणाशी संबंधित मुद्यांवर देखील ही संस्था कार्य करीत आहे.
ही याचिका दाखल करण्यामागची पृष्ठभूमी १३ वर्षे पूर्वीच्या एका घटनेशी निगडित आहे, असे चौकसे सांगतात. १३ वर्षांपूर्वी ते ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपट बघायला गेले असता, राष्ट्रगीत लागले. चौकसे ताठ उभे राहिले. परंतु, ते सोडून दुसरे कुणीच उभे राहिले नव्हते. त्यांच्यामागे बसलेल्या प्रेक्षकांनी, आम्हाला दिसत नाही, म्हणून तक्रारही केली. स्वत: उभे राहण्याऐवजी त्यांनी चौकसे यांनाच खाली बसण्यास सांगितले. या घटनेचा चौकसेंच्या मनावर आघात झाला.
या घटनेने तसेच या चित्रपटातील राष्ट्रगीताचा व्यावसायिक वापर बघून व्यथित झालेल्या चौकसे यांनी मग मध्य प्रदेशच्या जबलपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांच्या भावनेशी सहमत होत, हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यावर बंदी घातली. नंतर मात्र या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी मात्र चौकसे यांनी, राष्ट्रगीताचा अपमानाच्या काही घटनांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि यावर योग्य तो निर्णय देण्याची मागणी केली. बुधवारच्या न्यायालयाच्या निर्णयाचे चौकसे यांनी मनापासून स्वागत केले आहे. यासाठी चौकसे यांचा १५ वर्षांचा संघर्ष आहे. चौकसे म्हणाले की, मला माहीत आहे की, आता लोक मला भाजपाशी जोडणे सुरू करतील. परंतु, मी कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

   व्हिडीओ संग्रह

   मागील बातम्या, लेख शोध

   Search by Date
   Search by Category
   Search with Google