Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » संघ, भाजपा, विहिंप नेते इसिसच्या रडारवर

संघ, भाजपा, विहिंप नेते इसिसच्या रडारवर

♦भारतातील विदेशी पर्यटकांच्याही हत्येची योजना
♦एनआयए, अमेरिकन दूतावासाचा इशारा,
nia-national-investigation-agency1नवी दिल्ली, [२ नोव्हेंबर] – रा. स्व. संघ, भाजपा आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांसह भारतातील विदेशी पर्यटक इसिसच्या रडारवर असून, त्यांची हत्या करण्यासह काही महत्त्वाच्या ठिकाणी आत्मघाती हल्ले घडवून आणण्याची या जहाल दहशतवादी गटाची योजना असल्याचा इशारा राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए आणि अमेरिकन दूतावासाने दिला आहे.
सध्या सीरियात बसलेला इसिसचा भारतातील म्होरक्या शफी अरमार उर्फ युसूफ अल् हिंदी याने ही घातक योजना आखली आहे. संघ, भाजपा व विहिंप नेतेच आपले टार्गेट असायला हवे, असे निर्देश त्याने भारतातील इसिसच्या अतिरेक्यांना ऑनलाईन दिले आहेत. विदेशी पर्यटकांना ठार मारा आणि सोबतच संघ परिवारातील नेत्यांचीही हत्या करा, असे तो ऑनलाईन चॅटिंगद्वारे सांगत असतो, अशी धक्कादायक माहिती एनआयएने जेरबंद केलेल्या इसिसच्या एका नेत्याने दिली आहे.
एनआयएच्या अधिकार्‍यांनी अलीकडेच इसिसच्या काही अतिरेक्यांना जेरबंद केले होते. त्यांची कसून चौकशी सुरू असून, आतापर्यंतच्या तपासातून जी माहिती समोर आली, ती धक्कादायक आहे. भारतात विविध देशांचे पर्यटक मोठ्या संख्येत येत असतात. त्यांची हत्या करून भारताला जगभरात बदनाम करण्याची इसिसची योजना आहे. इसिसच्या या घातक योजनेची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्थांनाही प्राप्त झाली असून, नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने भारतातील आपल्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
केवळ अमेरिकाच नव्हे, तर इंग्लंड, कॅनडा आणि इस्रायल यासारख्या देशांमधून भारतात पर्यटनासाठी येणारे नागरिकही इसिसच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरू शकतात, असे एनआयएने आपल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला असून, सरकारने देशभरातील तपास व गुप्तचर यंत्रणांना अतिसतर्कतेचा आदेश जारी केला आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
मोहम्मद मसिउद्दिन उर्फ मुसा असे नाव असलेल्या इसिसच्या भारतातील एका वरिष्ठ नेत्याने इसिसच्या योजनेची माहिती एनआयएला दिली. अलीकडील काळात सुमारे १५ ते १६ अतिरेक्यांना एनआयएने विविध राज्यांमध्ये धाडी टाकून अटक केली. यातील काही अतिरेक्यांनी कोलकाता येथील मदर तेरेसा हाऊसचीही रेकी केल्याचे मूसाने सांगितले. ही रेकी सुरू असतानाच तेथील विदेशी पर्यटकांवर हल्ला करण्यात येणार होता, असा खुलासा मूसाने केला. याशिवाय, इसिसचा भारतातील म्होरक्या शफी अरमार उर्फ युसूफ अल् हिंदी यानेही काही बड्या राजकीय नेत्यांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे तो म्हणाला. युसूफ सध्या सीरियात आहे आणि तिथेच बसून तो इसिसच्या भारतातील अतिरेक्यांना दिशानिर्देश देत आहे.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google