Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » संपुआचा आणखी एक घोटाळा; ८०० कोटींची लाच

संपुआचा आणखी एक घोटाळा; ८०० कोटींची लाच

=हॉक जेट ट्रेनरच्या इंजिन खरेदीसाठी ८०० कोटींची लाच=
hawk-jet-trainer-aircraftनवी दिल्ली, [१ नोव्हेंबर] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी आणि लढाऊ विमानांच्या खरेदीतील घोटाळ्यानंतर कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारच्या काळातील आणखी एक मोठा घोटाळा आता उघडकीस आला आहे. हॉक जेट ट्रेनर विमानाचे इंजिन खरेदी करण्याच्या व्यवहारात सुमारे ८०० कोटी रुपयांची लाच दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि ब्रिटनस्थित रोल्स रॉईस यांच्यात २०११ मध्ये हॉक जेट ट्रेनरच्या इंजिनच्या खरेदीसाठी १० हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. या इंजिनच्या व्यवहारासाठी रोल्स रॉईसकडून १० मिलियन पाऊंड म्हणजेच ८०० कोटी रुपयांची लाच घेण्यात आली होती. याबाबतचे वृत्त एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले आहे. ब्रिटनमध्ये तयार झालेली हॉक विमाने भारतात नौदल आणि हवाईदलाकडून खरेदी केली जातात. या विमानात ब्रिटिश कंपनी रोल्स रॉईसचे इंजिन बसविण्यात आले आहे.
शस्त्रास्त्र खरेदीचा व्यवहार करणारा मध्यस्थ सुधीर चौधरी याला ही लाच देण्यात आली होती. यापूर्वीही सुधीर चौधरीवर लाच घेतल्याचे आरोप झाले आहेत. २०१४ मध्ये त्याला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली होती, पण पुराव्यांअभावी त्याला सोडून देण्यात आले होते. सुधीर चौधरीला रशियातील कंपन्यांनी क्रूझ क्षेपणास्त्रांच्या नावाखाली २००७-०८ मध्ये १०० दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे ७ हजार कोटी रुपये दिले होते, अशी माहितीही समोर आली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google