Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » संपूर्ण संपत्ती सामाजिक संस्थांना दान करणार

संपूर्ण संपत्ती सामाजिक संस्थांना दान करणार

=बिल गेट्‌स यांची घोषणा=
bil-gatesलंडन, [२ नोव्हेंबर] – सध्या स्थितीत साडेपाच लाख कोटींच्या साम्राच्याचे स्वामी असलेले मायक्रोसॉफ्टचे सर्वेसवा बिल गेट्‌स यांनी आपली संपूर्ण संपत्ती समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक संस्थांना दान करण्याची घोषणा केली.
बिल गेट्‌स यांच्या या अनपेक्षित घोषणामुळे जगभरातील उद्योग क्षेत्रात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एका टीव्हीवरील विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, ‘मी माझ्या मुलांना संपत्ती देणार नाही; तर ती सामाजिक संस्थांना दान करणार आहे.’
बिल गेट्स यांना २० वर्षे वय असलेली जेनिफर, १७ वर्षीय रॉरी आणि १४ वर्षीय फिबी अशी तीन मुले आहेत. त्यांना आपण उत्तम दर्जाचे शिक्षण देत आहो. संपत्ती मात्र देणार नाही, मुलांना संपत्तीतील थोडा फार वाटा नक्कीच मिळेल. तथापि, त्यांनी बाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहावे आणि स्वत:चे वेगळे साम्राज्य निर्माण करावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. मी जर त्यांना जास्त पैसा दिला, तर ते स्वत:चे आयुष्य घडवू शकणार नाही, असे मतही बिल गेट्स यांनी व्यक्त केले. दरम्यान, बिल गेट्स आपली संपूर्ण संपत्ती बिल ऍण्ड मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशन या त्यांच्या सामाजिक संस्थेला देणार असल्याची माहिती आहे. ही संस्था जगभरात शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवत असते.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google