Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » संयुक्त राष्ट्रसंघात भारतीयांची बाजी

संयुक्त राष्ट्रसंघात भारतीयांची बाजी

♦अर्थसंकल्पीय सल्लागार समितीवर महेशकुमार
♦गुंतवणूक समितीवर माधव धर यांची फेरनिवड,
madhav-dhar-maheshkumar-unoसंयुक्त राष्ट्रसंघ, [५ नोव्हेंबर] – संयुक्त राष्ट्रसंघाच्या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय समित्यांवर भारतीयांची सातत्याने निवड होत असून, भारतीयांनी यावर्षी चांगलीच बाजी मारली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पीय आणि प्रशासकीय सल्लागार समितीवर शुक्रवारी महेश कुमार या अधिकार्‍याची सदस्य म्हणून सर्वसंमतीने निवड झाली. विशेष म्हणजे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या गुंतवणूक समितीवर भारतीय अधिकारी माधव धर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. गुंतवणूक समितीवर फेरनिवड झालेले माधव धर यांच्याकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांना गुंतवणूक धोरण ठरविण्याचा सल्ला देण्याची जबाबदारी आहे.
दोन दिवसांपूर्वीच ऍड. डॉ. अनिरुद्ध राजपूत यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर सदस्य म्हणून निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर सदस्य म्हणून निवड होणारे ते पहिलेच भारतीय होत.
महेशकुमार यांची आशिया-पॅसिफिट गटातून निवड झाली असून, त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी येथे दिली.
भारतीय विदेश सेवेतील अधिकारी असलेले महेश कुमार यांनी यापूर्वी नवी दिल्ली, ब्रुसेल्स, तेल अवीव आणि रामल्ला येथे यापूर्वी विविध जबाबदारीची पदे सांभाळली आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google