Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » संरक्षण मंत्रालयात पहिल्या दिवशी पाय थरथरले!

संरक्षण मंत्रालयात पहिल्या दिवशी पाय थरथरले!

=मनोहर पर्रीकरांनी सांगितला अनुभव=
वृत्तसंस्था
पणजी, २८ नोव्हेंबर –
manoharparrikarसंरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी प्रथमच संरक्षण मंत्रालयातील आपल्या कार्यालयात पाय ठेवला, त्यावेळी माझा थरकाप उडाला होता. पण, चेहर्‍यावर मात्र मी अजिबात घाबरलो नाही, असे दाखविण्याचा प्रयत्नही करीत होतो, अशी  कबुली संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
एका कार्यक्रमात ते बोलत होते. गोव्यात मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक मला संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले. नाईलाज होता. आदेश पाळला आणि थेट दिल्ली गाठली. मला दिल्लीचा अनुभव होता. पण, जेव्हा मी संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा मला या खात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. इतकेच काय, जेव्हा मी संरक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी कार्यालयात गेलो, तेव्हा माझे पाय अक्षरश: थरथरत होते. गोव्यात मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाचा भरपूर अनुभव असल्याने केवळ या अनुभवाच्या जोरावर मी इतरांना तसे जाणवू दिले नाही, असे पर्रीकर म्हणाले.
प्रत्यक्षात मला लष्करी अधिकार्‍यांच्या पदांबद्दलही माहिती नव्हती, असा अनुभव पर्रीकर यांनी कथन केला. १९६१ मध्ये भारतीय फौजांनी पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याला मुक्त केले. त्यानंतर झालेली १९६५ आणि १९७१ ची युद्धे माझ्या लक्षात आहेत. कारगिल युद्धाच्यावेळीही मी घोषणा दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी प्रत्यक्षात मला युद्ध म्हणजे नेमके कसे असते, हे माहीत नव्हते. संरक्षणमंत्री झाल्यानंतर आपल्याकडे फारसा शस्त्रसाठा नाही आणि जवानांचे हात बांधले आहेत, हे माझ्या लक्षात आले. मी गेल्या दोन वर्षांत फार काही केले नाही. मात्र, हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची मोकळीक तुम्हाला आहे, हे मी जवानांना सुरुवातीलाच स्पष्ट केले. जवानांना मोकळीक दिल्याचा परिणाम तुम्ही पाहात आहात. पाकी सैनिकांकडून होणार्‍या प्रत्येक हल्ल्याला आपल्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सर्जिकल स्ट्राईकची तर पाकी सैनिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत असल्याने पाककडून शांतता राखण्याची विनंती होत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सीमेवर एकदाही गोळीबार झालेला नाही, याकडे पर्रीकर यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google