Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर –
sansad-bhavanसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. नोटबंदी आणि अन्य मुद्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केल्यामुळे हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्यावर उद्या राष्ट्रपती भवनावर सर्वपक्षीय मार्च नेण्याची घोषणाही विरोधी पक्षांनी केली आहे.
१ एप्रिलपासून सरकारला देशभर जीएसटी लागू करायचे आहे, त्यामुळे जीएसटीसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी आठवडाभर आधी बोलवण्यात आले आहे. सामान्यपणे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असते.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही यावेळी लवकर बोलवले जाणार आहे. सामान्यपणे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्‌‌‌यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि २८ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जात असतो. यावर्षी अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. यावर्षी  रेल्वे अर्थसंकल्प न मांडण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटीसंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे. त्याचप्रमाणे मोटरवाहन सुरक्षा विधेयकही या अधिवेशनात पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. १६ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
नोटबंदींच्या निर्णयावरून अधिवेशनात सरकारला घेरण्याची व्यूहरचना कॉंग्रेसच्या नेतृत्वात  विरोधी पक्षांनी आखली आहे, त्याचाच भाग म्हणून उद्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती भवनावर सर्वपक्षीय मार्च नेण्याची घोषणा करण्यात आली आहे. नोटबंदीचा निर्णय रद्द करण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी यावेळी राष्ट्रपतींकडे करण्यात येणार आहे.
नोटाबंदीसोबतच वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर माजी सैनिकाने केलेली आत्महत्या, भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगातून पळालेल्या सिमीच्या अतिरेक्यांचा चकमकीत झालेला मृत्यू आणि अन्य मुद्यावर सरकारवर हल्ला चढवण्याची तयारी विरोधकांनी केली.

शेअर करा

Posted by on Nov 16 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google