Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसदेत गाजणार नोटबंदीचा मुद्दा

संसदेत गाजणार नोटबंदीचा मुद्दा

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] –
sansad-topपाचशे व हजारच्या नोटांवर बंदी घालण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष सातत्याने या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत आहे. प्रारंभी या निर्णयाचे स्वागत करणारे कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस व बसपा आता आक्रमक झाले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेस नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करणार आहे.
संसदेत जर कॉंग्रेस नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करणार असेल, तर ती त्यांची इच्छा असेल. केंद्र सरकार त्याला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले.
प्रत्येक जण काळेधन रोखू इच्छित आहे. जे देशहितासाठी आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे, असे सांगून कॉंग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन म्हणाले, ज्या गावात एटीएमच नाही, अशा लोकांनी काय करावे? एटीएममध्ये लवकरच २००० रुपयांच्या नोटा मिळणार, परंतु त्या मोठ्या नोटांचे काय करणार, लोकांना ५०० रुपयांच्या नोटा हव्यात.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, काळ्या पैशाची समस्या निवारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी स्वीस बँक खातेधारकांविरुद्ध कारवाई करायला पाहिजे तसेच त्यांनी प्रामाणिक व्यापार्‍यांचे शोषण करणे थांबवावे.
आणखी कारवाईचे संकेत
काळेधन ठेवणार्‍यांविरुद्ध आणखी एक कारवाई करण्याची ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. रद्द करण्यात आलेल्या नोटा जमा करण्याची ३० डिसेंबर ही मुदत संपल्यानंतर आणखी एक पाऊल उचलण्याचे संकेत मोदी यांनी दिले. ज्या लोकांकडे बेहिशेबी पैसा आहे, त्यांना सोडणार नाही. प्रामाणिक लोकांना सरकारची भीती बाळगण्याची गरज नाही. या नोटबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्ष जनतेला माझ्याविरुद्ध भडकवित आहे, असेही ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google