Home » ठळक बातम्या, पंजाब-हर, राज्य » सतलज-यमुना लिंकबाबत निकालाचा निषेध

सतलज-यमुना लिंकबाबत निकालाचा निषेध

-कॉंगे्रसच्या ४२ आमदारानी राजीनामा दिला=
amarinder-singh-ptiचंदीगड, [११ नोव्हेंबर] – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सतलेज-यमुना लिंकवरील निकाल हरयाणाच्या बाजूने दिल्यानंतर पंजाबमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंगे्रसच्या ४२ आमदारांनी आज या निकालाच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामा दिला.
मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल राज्यातील नागरिकांचे हित जोपासण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग यांनी केला असून, या मुद्यावर आपला पक्ष रविवारी भव्य रॅलीचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले.
आज सकाळी कॉंगे्रसच्या सर्व ४२ आमदारांनी विधानभवन गाठले आणि विधानसभेचे सचिव शशी लखनपाल मिश्रा यांना राजीनामे सादर केले. यावेळी पक्षाचे काही वरिष्ठ नेते या आमदारांच्या सोबत होते. विधानसभेचे अध्यक्ष चरणजित सिंग अटवाल राज्याबाहेर असल्याने ते परत आल्यानंतर हे सर्व राजीनामे मी त्यांच्या स्वाधीन करणार आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
आता आम्ही रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारणार आहोत. लोकांमध्ये जाऊन हा मुद्दा उपस्थित करणार आहोत. पंजाबच्या अधिकारांचे रक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या अकाली दल-भाजपा सरकारचे पुतळे ठिकठिकाणी जाळणार आहोत, असे अमरिंदर सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हर, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google