Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » समाज भक्कम करण्यासाठी स्त्रीला सक्षम करा : सुमित्रा महाजन

समाज भक्कम करण्यासाठी स्त्रीला सक्षम करा : सुमित्रा महाजन

=अ. भा. प्रेरणा शिबिरात ‘राष्ट्राच्या विकासात परिवाराची भूमिका’ या विषयावर परिसंवाद=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर –
sumitra-mahajan1समाजाचा आधार परिवार असतो, आणि परिवाराचा आधार स्त्री असते, त्यामुळे आम्ही स्त्रीला सक्षम केले पाहिजे, असे आवाहन लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले.
राष्ट्र सेविका समितीच्या अ. भा. प्रेरणा शिबिरात ‘राष्ट्राच्या विकासात परिवाराची भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून सुमित्रा महाजन बोलत होत्या. संस्कृती संरक्षण, सामाजिक समरसता आणि आर्थिक विकासात परिवाराची भूमिका महत्त्वपूर्ण असते, आणि परिवार चालवण्याची जबाबदारी महिलेवरच असते, याकडे लक्ष वेधत महाजन म्हणाल्या की, संस्कृतीचे संरक्षण करण्याची जबाबदारी महिलांवर असते, कारण महिलाच घरातून संस्कार करत असतात. ज्याप्रमाणे शरीरातील सर्व अंगाचे महत्त्व असते, त्याप्रमाणे समाजात समाजातील सर्व घटकांचे महत्त्व असते.
समाजातील सर्व घटकांनी भेदभाव आणि आपसतील वैमनस्य विसरुन काम केले तर सामाजिक समरसता प्रस्थापित होऊ शकते, समाजाचा विकास आणि प्रगती होऊ शकते. सामाजिक समरसता संस्कारातून येत असते. दलित समाजातील लोकांकडे भोजन करून वा आंतरजातीय विवाह करून नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देशाच्या आर्थिक विकासात परिवारातील महिलाच मोठे योगदान देऊ शकतात, याकडे लक्ष वेधत महाजन म्हणाल्या की, ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे सध्या जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती महिलाच सावरू शकतात. नुसत्या गोष्टी करून समाजात परिवर्तन येणार नाही, तर त्यासाठी आम्हाला बदलावे लागेल, असे त्या म्हणाल्या.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या कुलगुरू डॉ.  उमा वैद्य यांनी परिवार : संस्कृत आणि संरक्षण या विषयावर आपले विचार मांडले. भारतीय संस्कृती शाश्‍वत आहे, तिचा प्रवाह निरंतर आहे, कारण भारतीय संस्कृतीचा मुळ आधार परिवार आहे, आणि परिवारच संस्कृतीचे रक्षण करत असतो, याकडे डॉ. वैद्य यांनी लक्ष वेधले.
राजस्थान वित्त आयोगाच्या अध्यक्ष डॉ. ज्योतीकिरण शुक्ला यांनी परिवार : आर्थिक विकास या विषयावरील परिसंवादात भारतीय विकासाचा मुळ आधार हा कुटुबंव्यवस्था आहे, आणि कुटुंबव्यवस्थेचा आधार स्त्री असल्याचे सांगितले. आमच्याकडे भौतिकतेत नाही तर अध्यात्मिकेत सुख मानले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मानवीय संबंधांचे नावच परिवार असल्याचे महिला विद्यापीठ विजयपूरच्या डॉ. मीना चंदावरकर यांनी स्पष्ट केले. परिवार हा समाजरूपी इमारतीचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. समाजरूपी इमारत समरसतेच्या भक्कम पायावर उभी करण्यासाठी आम्हाला भेदभाव आणि जाती-पातीचा त्याग करावा लागेल, असे त्या म्हणाल्या.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google