Home » छायादालन, ठळक बातम्या, फिचर, विज्ञानभारत » समुद्री राक्षसानंतर आत रशियाचा ‘किलर रोबोट’!

समुद्री राक्षसानंतर आत रशियाचा ‘किलर रोबोट’!

वृत्तसंस्था
मॉस्को, २० नोव्हेंबर –
russia-showcasing-brand-new-killer-robotमॉस्को येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय लष्करी प्रदर्शनात रशियाच्या लष्कराने १० हजारावर विविध आधुनिक शस्त्रे जगापुढे ठेवलीत. या प्रदर्शनातील ‘किलर रोबोट’ने चांगलीच खळबळ उडवून दिली. हा किलर रोबोट चार मैलांच्या अंतरावरून अचूक निशाणा साधून शत्रूचा नायनाट करू शकतो. यापूर्वी रशियाने ‘समुद्री राक्षस’ (सी मॉंस्टर) या नावाने ओळखली जाणारी युद्धनौका तयार केली होती.
‘टर्मिनेटर’ चित्रपटात दाखविल्याप्रमाणेच हा रोबोट आहे, हे विशेष! शत्रुच्या सैनिकांचा चार मैल अंतरावरून वेध घेण्याची त्याची सध्याची क्षमता असली, तरी, हा रोबोट सहा मैलांपर्यंत लक्ष्याचा वेध घेऊ शकतो. जमिनीवरील वाहने तसेच आकाशात टेहळणी करणारी ड्रोन विमाने यांना नष्ट करण्यासाठी या रोबोटची रचना करण्यात आली आहे. राडार तंत्रज्ञान, दीर्घ पल्ल्याची मारकक्षमता, व्हिडिओ चित्रांकन ही या रोबोटची वैशिष्ट्ये आहेत. सध्या रशियन सीमारेषेवर हे रोबोट्‌स तैनात करण्यात येणार आहेत.
सी मॉंस्टरनंतर रशियाने संहारक किलर रोबोट तयार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता ‘किलर रोबोट’ंचा जवाब विकसित राष्ट्रे कशी देतात, याबद्दल जगभरातील संरक्षण दलाच्या अभ्यासकांना आणि विशेषज्ञांना उत्सुकता आहे.
चौकट
‘सी मॉंस्टर’नंतरचा शोध!
‘सी-मॉंस्टर’नंतर रशियाने हा संहारक रोबोट तयार केला आहे.१९८० मध्ये रशिया सोव्हिएट युनियनचा भाग असताना अमेरिका, ब्रिटनसह नाटो देशांना धडा शिकविण्यासाठी रशियाने समुद्रात आपला ‘सी- मॉन्स्टर’ समुद्री राक्षस उतरवला होता. अर्थात एका युद्धनौकेला हे नाव देण्यात आले होते. या युद्धनौकेची संहारक्षमता बघूनच अनेक देशांची गाळण उडाली होती. ताशी २०० ते २५० किमी अशी या युद्धनौकेची गती होती. पुढे तीन वर्षांनी अमेरिकेच्या उपग्रहांनी त्याचा शोध लावला. तेव्हा कुठे जगापुढे ही गोष्ट आली. या युद्धनौकेच्या गतीमुळेच ‘सी मॉंस्टर’ राडारवर दिसत नव्हता. त्यावर अण्वस्त्र क्षेपणास्त्रे बसविण्यात आली होती. सोव्हियत युनियनच्या विघटनानंतर ही युद्धनौका पुढे रशियाच्या वाट्याला आली.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, फिचर, विज्ञानभारत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google