Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » सरकारने ग्रेवाल कुटुंबाची माफी मागावी : राहुल गांधी

सरकारने ग्रेवाल कुटुंबाची माफी मागावी : राहुल गांधी

PTI8_5_2013_000255Bतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [४ नोव्हेंबर] – वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. सरकारने वन रँक वन पेन्शन योजना लागू केली नाही, फक्त पेन्शनमध्ये थोडी वाढ केली, असे ते म्हणाले.
या मुद्यावर आंदोलन करणार्‍या माजी सैनिकांची र्कॉग्रेस मुख्यालयात भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी या मुद्यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांशी पोलिसांनी दुर्व्यवहार केला, असा आरोप करीत गांधी म्हणाले की, रामकिशन ग्रेवाल यांचा मृतदेह बाहेर पडला असताना पोलिसांनी त्यांच्या मुलाला आणि भावाला आतमध्ये डांबून ठेवले. मला पोलिस ठाण्यात डांबल्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, पण शहीद सैनिकाच्या कुटुंबीयांना पोलिसांनी मारहाण केली, त्यांना पोलिस ठाण्यात फरफटत आणण्यात आले, हे योग्य नाही, याबद्दल सरकारने ग्रेवाल यांच्या कुटुंबाची माफी मागितली पाहिजे. असा प्रकार माजी सैनिकच नाही तर कोणाहीबद्दल होऊ नये, असे ते म्हणाले.
मोदी यांनी खोटे बोलणे थांबवावे, देशवासीयांची दिशाभूल करू नये. माजी सैनिकांसाठी तातडीने वन रँक वन पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी गेल्या तीन दिवसांपासून लावून धरला आहे. सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केली असती तर माजी सैनिकांवर जंतरमंतरवर आंदोलनावर बसायची वेळ आली नसती, असे ते म्हणाले. या देशात ना शेतकर्‍यांना प्रतिष्ठा आहे, ना सैनिकांना असे राहुल गांधी म्हणाले.
वन रँक वन पेन्शनच्या लढाईत मी तुमच्यासोबत असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी माजी सैनिकांना दिला. हा पैशाचा मुद्दा नाही, तर आमच्या सन्मानाचा आणि न्यायाचा प्रश्‍न आहे, असे माजी सैनिकांनी आपल्याला सांगितल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google