Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » सर्व स्मार्टफोनमध्ये भारतीय भाषा बंधनकारक

सर्व स्मार्टफोनमध्ये भारतीय भाषा बंधनकारक

smartphone1मुंबई, ३० ऑक्टोबर, (हिं.स.) : केंद्र सरकारने जारी  केलेल्या एका परिपत्रकानुसार १ जुलै २०१७ पासून भारतात विकल्या जाणार्‍या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करणे अनिवार्य असणार आहे.
मानक विषयीच्या कायद्यातील कलम १०(१) नुसार भारतात विकल्या जाणार्‍या स्मार्टफोनमध्ये भारतीय भाषांचा समावेश बंधनकारक करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार मोबाईल कंपन्यांना स्मार्टफोनमध्ये लघु संदेश (एसएमएस ) वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांचा पर्याय असणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील इंग्रजी न बोलणार्‍या लोकांना मोबाईलचा वापर सुकर  होणार आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google