Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » सहकार्य हाच एकमेव तोडगा

सहकार्य हाच एकमेव तोडगा

=जिनपिंग यांचा ट्रम्पपुढे प्रस्ताव=
वृत्तसंस्था
बीजिंग, १४  नोव्हेंबर –
donald-trump-xi-jinpingअमेरिका आणि चीनमधील ताणले गेलेले संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करणे हाच एकमेव तोडगा आहे. याशिवाय, दुसरा कोणताही उपाय नाही, असा प्रस्ताव चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे ठेवला आहे.
जिनपिंग यांनी आज सकाळी ट्रम्प यांना फोन केला. आपल्या पहिल्या दूरध्वनी संवादात जिनपिंग यांनी त्यांचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. दोन्ही देशांमधील ३७ वर्षे जुन्या राजनयिक संबंधाचा फायदा उभयतांच्या नागरिकांना मिळायला हवा आणि त्यासाठीच आपण एकमेकांना सहकार्य करायला हवे, असे मत यावेळी जिनपिंग यांनी व्यक्त केले.
द्विपक्षीय सहकार्य हाच आपल्यापुढे एकमेव आणि योग्य पर्याय आहे. चांगल्या संबंधातच दोन्ही देशांचे हित आहे. अमेरिकेतील नव्या सरकारसोबत एकत्रित काम करण्यास आम्ही देखील इच्छूक आहोत, असेही जिनपिंग म्हणाले. यावेळी चांगले द्विपक्षीय संबंध ठेवण्यासाठी आपले व्हाईट हाऊस पुरेपूर प्रयत्न करेल, अशी हमी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google