Home » अर्थभारत, ठळक बातम्या » सायरस मिस्त्रींच्या हकालपट्टीनंतर आणखी दोघांचा राजीनामा

सायरस मिस्त्रींच्या हकालपट्टीनंतर आणखी दोघांचा राजीनामा

Cyrus Mistryनवी दिल्ली, ३० ऑक्टोबर, (हिं.स.) : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर मनुष्यबळ विभागाचे प्रमुख एन.एस. राजन यांच्यानंतर आता मधु कन्नन व निर्माल्या कुमार यांनीही टाटा समूहाला रामराम ठोकला आहे. या दोघांनीही मिस्त्री यांच्या कार्यकाळात पदभार स्विकारला होता.
मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. २०१३ साली मिस्त्री यांनी पाच सदस्यीय संचालक मंडळ स्थापन केले होते. यात कन्नन हे व्यवसाय विकास व कॉर्पोरेट व्यवहार पाहत होते. तर निर्मला कुमार धोरणात्मक सल्लागार म्हणून काम पाहत होते. या दोघांनीही टाटा समूहाच्या सर्व पदांवरून राजीनामा दिला आहे.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under अर्थभारत, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google