Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » सार्क उपग्रहाचे मार्चमध्ये प्रक्षेपण

सार्क उपग्रहाचे मार्चमध्ये प्रक्षेपण

=इस्रोची घोषणा, पंतप्रधान मोदी यांची स्वप्नपूर्ती=
saarc_satellite_projectतिरुवनंतपुरम्, [८ नोव्हेंबर] – दक्षिण आशियाई देशांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी सार्क उपग्रह अखेर साकारास येत असून, त्याचे पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
सार्क समूहातील सदस्य राष्ट्राच्या कल्याणासाठी पंतप्रधान मोदी यांनी अशा प्रकारचा उपग्रह विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अंतराळ क्षेत्रात उंचच उंच भरार्‍या घेत असलेल्या आणि जगालाही आश्‍चर्य वाटेल अशी कामगिरी करीत असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने तातडीने पावले उचलली आणि हा उपग्रह विकसित केला.
या उपग्रहाचे प्रक्षेपण याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये करण्यात येणार होते. पण, काही कारणांमुळे आम्ही ते पुढे ढकलले असून आता ते पुढील वर्षी मार्चमध्ये करण्याचे निश्‍चित झाले आहे, अशी घोषणा इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी आज मंगळवारी येते एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रपरिषदेत केली.
नोव्हेंबर २०१४ मध्ये नेपाळमध्ये आयोजित सार्क परिषदेत सार्क उपग्रहाबाबत आपले मनोगत बोलून दाखवले होते. टेलेकम्युनिकेशन आणि टेलेमेडिसिनसह अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सार्क समूहातील सर्व सदस्य देशांना फायदा व्हावा, यासाठी सार्क उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची आपली इच्छा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. सार्क देशांना ही भारताकडून सर्वात मोठी भेट असेल, असेही पंतप्रधान म्हणाले होते.
विकासाची कास सोडून दहशतवादाचा मार्ग स्वीकारणार्‍या पाकिस्तानने सार्क उपग्रहाच्या प्रकल्पातून स्वत:ला बाजूला केल्यामुळे दक्षिण आशिया उपग्रह असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे. प्रादेशिक समूहाकरिता असलेल्या या उपग्रहाची रूपरेषा निश्‍चित करण्यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी सार्कमधील अन्य सदस्य देशांच्या तज्ज्ञांसोबतही चर्चा केली.
आमची तयारी अतिशय जोरात सुरू आहे. या उपग्रहाला अंतराळात नेणार्‍या जीएसएलव्ही मार्क-३ची डिसेंबर महिन्यात चाचणी घेण्यात येईल. श्रीहरीकोटा येथे प्रक्षेपणाकरिता आवश्यक सामुग्रीची जमवाजमव सुरू आहे. जीएसएलव्हीचे यश आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, सुमारे ४ टन वजनाचे उपग्रह अंतराळात पाठवणे यामुळे आम्हाला शक्य होणार आहे, असे किरण कुमार यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google