Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर दक्षता आयोगाचा अंकुश

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर दक्षता आयोगाचा अंकुश

=एक कोटींवरील घोटाळ्यांची माहिती द्यावी लागणार=
dakshta-ayog-vigilance-departmentनवी दिल्ली, [३१ ऑक्टोबर] – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आता एक कोटी रुपयांवरील घोटाळ्यांची माहिती केंद्रीय दक्षता आयोगाला द्यावी लागणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्याबाबतचा निर्णय दक्षता आयोग घेणार आहे.
५० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या गैरव्यवहार प्रकरणांवर दक्षता आयोग नजर ठेवणार आहे. यासाठी दरमहा रिझर्व्ह बँक, सीबीआय आणि बँकेच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांची बैठक केंद्रीय दक्षता आयोगातर्फे बोलविण्यात येणार आहे.
आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना गैरव्यवहाराची माहिती रिझर्व्ह बँकांना देणे बंधनकारक होते. मात्र, आता केंद्रीय दक्षता आयोगाने पुढाकार घेत ही माहिती स्वत:कडे देणे बँकांना अनिवार्य केले आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय दक्षता आयुक्त टी.एम. भसीन यांनी दिली.
घोटाळेबाजांची काम करण्याची विशिष्ट पद्धत काय आहे, त्याची प्रणालीही बँकांना दक्षता आयोगाकडे सोपवायची आहे. महाव्यवस्थापक पदावरील चार अधिकार्‍यांची सल्लागार म्हणून दक्षता आयोगाने नेमणूक केली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google