Home » छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हर, राज्य » सिंधूचा एक थेंबही पाकला देणार नाही!

सिंधूचा एक थेंबही पाकला देणार नाही!

=पंतप्रधान मोदी यांचा ठोस संदेश=
वृत्तसंस्था
भटिंडा, २५ नोव्हेंबर –
modi-in-punjab-bhatindaभारताचा हक्क असलेल्या सिंधू नदीतील पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानाला जाऊ देणार नाही, असे जाहीर करताना भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकमधून अद्यापही सावरला नसलेल्या पाकिस्तानने आपल्या भारतविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. पाकचे सैनिक सीमेपलीकडून सातत्याने गोळीबार करीत आहेत. असे करून हा देश स्वत:चेच मोठे नुकसान करीत आहे, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे दिला.
विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या पंजाबमधील भटिंडा येथे एम्सच्या पायाभरणी समारंभानंतर आयोजित विशाल जाहीर सभेला ते संबोधित होते.
पंतप्रधान म्हणाले, यापूर्वीच्या सरकारच्या काळात सामर्थ्य असतानाही आपल्या जवानांना अशा प्रकारचे धाडस दाखवता येत नव्हते. पण, आम्ही जवानांना पूर्ण मोकळीक दिली आणि त्यांनी गुलाम काश्मिरात घुसून पाकला अद्दल घडवली. नियंत्रण रेषेपासून २५० किलोमीटर आतपर्यंत जवान घुसले होते. भारतीय जवानांच्या शौर्य आणि धाडसाची परिपूर्ण कल्पना आता पाकला आली असेलच, असा चिमटा नरेंद्र मोदी यांनी काढला.
भारतीय जवानांच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेपलीकडे भूकंप आल्यासारखेच धक्के बसले. या धक्क्यांतून पाकिस्तान अजूनही सावरलेला नाही, असे स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी यांनी पाकमधील नागरिकांनाही एक संदेश दिला. पेशावरमधील लष्करी शाळेत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आले होते. पाकच्या दु:खात प्रत्येक भारतीय सहभागी होता. तेव्हा पाकमधील जनता आपल्या राज्यकर्त्यांना एक प्रश्‍न विचारायलाच हवा आणि तो म्हणजे, पाकमधील राज्यकर्ते आपल्या शेजारील देशाविरोधात लढण्याऐवजी काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दारिद्र्याविरोधात लढा देऊ शकतील काय? पाकमधील नागरिकांना दारिद्र्यापासून मुक्ती आणि हातांना रोजगार हवा आहे, पण तेथील सत्ताधार्‍यांनी स्वत:च्या फायद्यासाठी देशात भारतविरोधी वातावरण निर्माण केले आहे.
पंजाबच्या शेतकर्‍यांचे कौतुक करताना, शेतकर्‍यांना पाणी मिळाले तर ते मातीतूनही सोनं पिकवू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आमच्या शेतकर्‍यांचा सिंधू नदीच्या पाण्यावर संपूर्ण अधिकार आहे. भारताच्या हक्काचे जे पाणी आहे, त्यातील एक थेंबही पाकला जाऊ देणार नाही. यापुढे भारताच्या वाट्यातील प्रत्येक थेंब पाणी थांबवून पंजाब व जम्मू-काश्मिरातील शेतकर्‍यांसाठी आणणार आहे. भारतातील शेतकर्‍यांना पुरेपूर पाणी मिळालेच पाहिजे, असेही पंतप्रधानांनी जाहीर केले.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हर, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google