Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » सिंधूचा वाद भारत-पाकच सोडवेल

सिंधूचा वाद भारत-पाकच सोडवेल

=बान की मून यांचा आशावाद=
वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्रसंघ, २९ नोव्हेंबर –
ban-ki-moonसिंधू नदीच्या पाण्यावरून निर्माण झालेल्या वादावर भारत आणि पाकिस्तान स्वत:च द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढेल, असा आशावाद संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी व्यक्त केला.
सिंधू, सतलेज, व्यास आणि रावी नदीच्या पाण्यावर केवळ भारतीयांचाच हक्क असल्याने यातील पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानकडे जाऊ देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच दिला होता. भारताने आक्रमक पवित्रा घेतल्याने पाकमधील राज्यकर्ते आणि लष्कराने नमते घेत, सीमेवरील गोळीबार थांबविण्याची आणि भारतासोबत द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याची तयारी दर्शवली.  याच अनुषंगाने बान की मून यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
भारत-पाकमधील घडामोडींवर आमचे लक्ष आहे. आम्हाला असे वाटते की, या दोन्ही देशांमध्ये ज्या काही समस्या आहेत, त्यावर ते द्विपक्षीय माध्यमातून तोडगा काढतील, असे बान की मून यांचे प्रवक्ते स्टीफन ड्युजेरिक यांनी सोमवारी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. सिंध जलकराराबाबत पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या इशार्‍यानंतर भारत-पाकमधील तणाव अधिकच वाढला आहे, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली होती.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google