Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » सिंधू अंतिम फेरीत

सिंधू अंतिम फेरीत

=चायना खुली सुपर सिरीज बॅडमिंटन=
वृत्तसंस्था
फुझो, १९ नोव्हेंबर –
pv-sindhuभारताच्या पी. व्ही. सिंधूने येथे सुरू असलेल्या चायना खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला.
आज झालेल्या महिलांच्या गटातील एकेरी उपांत्य सामन्यात पी. व्ही. सिंधूने दक्षिण कोरियाच्या जी ह्यून संग हिचा २-१ गेम्सने पराभव केला व स्पर्धेची निर्णायक फेरी गाठली. पहिला गेम ११-२१ गुणांनी गमावताच सिंधूवर प्रचंड दडपण आले होते. पण या धक्क्यातून सिंधूने स्वत:ला सावरले. प्रचंड आत्मविश्‍वास व अनुभवाचा पुरेपूर उपयोग करीत सिंधूने दुसरा गेम २३-२१ वर जिंकून १-१ ने बरोबरी साधली. तिसराही गेम चुरशीचा झाला. यात सिंधूने २१-१९ ने बाजी मारली व एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली. उभय स्पर्धकात ही झुंज एक तास २३ मिनिटे रंगली.
सूंगने पहिला गेम केवळ १६ मिनिटात जिंकला होता. दुसर्‍या गेममध्ये एका क्षणी सिंधू १७-२० ने माघारली होती. पण हार न मानणार्‍या सिंधूने २२-२० ने सामना जिंकून शर्यतीत कायम होती. दुसरा गेम ३५ मिनिटे चालला. तिसर्‍या गेममध्ये एका क्षणी दोन्ही स्पर्धक १०-१० व त्यानंतर १५-१५ गुणांनी बरोबरीत होत्या. १८-१८ अशी पुन्हा बरोबरी साधली गेली होती. पण त्यानंतर तिसरा व निर्णायक गेम सिंधूने जिंकला. ३३ मिनिटे झुंज चालली.
आतापर्यंत दोन्ही स्पर्धकात एकूण ८ लढती झाल्या. त्यातील पाचमध्ये सिंधूने विजय मिळविला. आता ९ पैकी सहा लढती सिंधूच्या नावावर आहेत.  या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पी. व्ही. सिंधूला चीनच्या विश्‍व आठव्या स्थानावरील सून यू हिच्याशी होणार आहे. या स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाली आहे. चायना ओपन स्पर्धेत आतापर्यंत २५ स्पर्धा झाल्या. त्यातील २३ स्पर्धा चीनच्या स्पर्धकांनी जिंकल्या आहेत. हे येथे उल्लेखनीय होय.
ज्या दोन स्पर्धा अन्य स्पर्धकांनी जिंकल्या त्यात भारताची सायना नेहवाल व मलेशियाची वॉन्ग होती. अंतिम फेरुीत सिंधूने बाजी मारली, तर या स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी सिंधू भारताची दुसरी खेळाडू ठरेल.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google