Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » सिंधू करार रद्द केल्यास कारवाई

सिंधू करार रद्द केल्यास कारवाई

=पाकची दर्पोक्ती=
nafees-zakariaइस्लामाबाद, [२१ ऑक्टोबर] – उरी येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानची जगभरात कोडी करण्यासाठी भारताने सिंधू नदी जलवाटप करारावर फेरविचार करण्याचे संकेत दिल्यानंतर तोंडचे पाणी पळालेल्या पाकने आता भारतालाच धमकी दिली आहे. आमचे पाणी बंद कराल तर आम्ही शांत बसणार नाही, अशी दर्पोक्ती पाकने केली आहे.
भारताने सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखला तर पाकिस्तान कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असे पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस जकारिया यांनी सांगितले. तथापि, पाक नेमकी कोणती कारवाई करेल, हे त्यांना सांगता आले आहे. काश्मीर खोर्‍यात भारतीय जवान सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करीत आहेत. तिथे मानवी हक्काचे अतिशय गंभीर उल्लंघन होत असून, यापासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठीच भारत अशा प्रकारच्या कारवाया करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाकिस्तानला जगात एकटे पाडण्याचे भारताचे प्रयत्न व्यर्थ ठरणार असल्याचेही ते म्हणाले. भारताने ब्रिक्स राष्ट्रसमूहाच्या व्यासपीठाचा वापर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठीच केला, असे सांगताना पाकिस्तानी कलाकारांसोबत भारताने केलेला व्यवहार निराशाजनक आणि खेदपूर्ण असल्याचेही ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google