Home » ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » सिमी घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न

सिमी घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न

=व्यंकय्या नायडू यांची टीका=
venkaiah-naidu2नवी दिल्ली, [१ नोव्हेंबर] – सिमीच्या आठ अतिरेक्यांना ठार मारणार्‍या चकमकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून देशातील काही राजकीय पक्ष या संवेदनशील घटनेलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज मंगळवारी केला.
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा महत्त्वाच्या मुद्यांचे राजकारण करून त्याला जातीय रंग देण्याचा नवा पायंडाच काही लोकांनी व राजकीय पक्षांनी सुरू केला असल्याचे दिसते. हे लोक केवळ दहशतवाद्यांचीच चिंता का करीत आहेत. काहींना सिमीची, तर काहींना कारागृहातून अतिरेकी कसे पळाले, याचीच चिंता जास्त असल्याचे दिसत आहे. देशाची सुरक्षा जोपासणार्‍या आणि त्यासाठी प्राणाहुती देणार्‍यांविषयी या लोकांना मुळीच चिंता नाही. त्यांना फक्त प्रत्येक संवेदनशील मुद्यांचे राजकारण करायचे आहे, असा आरोप नायडू यांनी केला.
आपल्या लष्करी जवानांनी गुलाम काश्मिरात जाऊन पाकी अतिरेक्यांचे प्रशिक्षण शिबिर उद्‌ध्वस्त करताना, अनेक अतिरेक्यांना ठार मारले, पण विरोधकांनी या कारवाईवर देखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. आता मध्यप्रदेशच्या राजधानी जवान व पोलिसांनी कारागृहातून पळ काढणार्‍या सिमीच्या आठ अतिरेक्यांना ठार केल्यानंतर त्यांनी यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. जातीय म्हणजे नेमके काय? गेल्याच आठवड्यात आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवरील जंगलात जवानांनी २८ माओवाद्यांना ठार केले होते, त्यावर कोणीच काही बोलले नाही, त्यांचा धर्म कोणता, जात कोणती याविषयी कुणीच विचारले नाही. पण, एका विशिष्ट धर्मातील अतिरेक्यांना मारल्यानंतर यांच्या पोटात का दुखू लागते, असा सवालही त्यांनी केला.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google