Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा पुन्हा होण्याची शक्यता

सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा पुन्हा होण्याची शक्यता

=शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होऊ शकतो निर्णय=
cbse-logoतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] – केंद्र सरकारतर्फे सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा २०१८पासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने सहा वर्षांपूर्वी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र शैक्षणिक दर्जा खालावण्याच्या आशंकेने ही परीक्षा पुन्हा घेण्याबाबत विचार पुढे आला आहे. या बाबत अंतिम निर्णय केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या दि. २५ ऑक्टोबरला आयोजित बैठकीत होईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेत सदर बैठक होणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा २०१०मध्ये रद्द करण्यात आली होती. त्याऐवजी दहावीची परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसईसोबत शाळांनाही दहावीची परीक्षा घेण्याचा अधिकार सीबीएसईने दिला होता. या अंतर्गत, ज्यांना दहावीची बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, त्यांनी बोर्डाची परीक्षा द्यावी, आणि ज्यांना अशी परीक्षा द्यायची नाही, त्यांनी दहावीची शाळेची परीक्षा द्यावी, अशी रचना करण्यात आली होती. या दोन प्रकारच्या व्यवस्थेमुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडत होता, त्याचप्रमाणे शिक्षणाचा दर्जाही घसरत होता. दहावीत बोर्डाची परीक्षा न देणार्‍या विद्यार्थ्यांवर एकदम बारावीत बोर्डाची परीक्षा देण्याचा ताण येत होता.
जुनी परीक्षा पद्धत रद्द केल्यानंतर विविध चाचण्या आणि श्रेणी प्रदान करण्याचा समावेश असलेली विद्यमान पद्धत अवलंबण्यात आली. प्रचलित पद्धतीमुळे तसेच विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याच्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निवेदन शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, पालक आणि संघटनांनी दरम्यान मनुष्यबळ विकास मंत्रालयास दिल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा नेमकी कधी सुरु करायची याबाबत मात्र सर्वसम्मती झालेली नाही, मात्र सन २०१८पासून ही परीक्षा सुरू होऊ शकते, अशी माहितीही या अधिकार्‍याने दिली.
अनुत्तीर्ण धोरण : आठवी की पाचवीपर्यंत?
सध्या आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचे धोरण आहे. या निर्णयातही बदल होण्याची मोठी शक्यता आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पाचवीपर्यंतच अनुत्तीर्ण न करण्याचे धोरण जाहीर होऊ शकते. संबंधित निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्यांनाही आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करता येईल.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google