Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » सीमेवर नापाक कारवाया सुरूच

सीमेवर नापाक कारवाया सुरूच

jk-mapजम्मू, [८ नोव्हेंबर] – जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या नियंत्रण रेषेवरील लष्करी तळांवर आणि लोकवस्त्यांवर पाकिस्तानच्या सैनिकांनी आज मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा बंदुका व तोफांचा जोरदार मारा केला.
सकाळी नऊच्या सुमारास पाकी बंदुका व तोफा आग ओकू लागल्या. भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. तथापि, भारतीय जवानांना यात कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
पाकच्या सैनिकांनी सोमवारी पूंछ जिल्ह्यातील मेंधार सेक्टरच्या नियंत्रण रेषेवरील लष्करी तळांवर आणि काही गावांवर जोरदार गोळीबार केला होता. यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले होते.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google