Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » सीमेवर वादळापूर्वीची शांतता!

सीमेवर वादळापूर्वीची शांतता!

=‘नापाक’ प्रयत्नांना चोख उत्तर देऊ : अरुणकुमार=

Jammu: Additional DG, BSF, Arun Kumar paying floral tribute to BSF Constable Gurnam Singh who lost his life in firing by Pakistan, during a wreath laying ceremony at BSF's Paloura Camp in Jammu on Sunday. PTI Photo  (PTI10_23_2016_000080A)

जम्मू, [२३ ऑक्टोबर] – सीमेवर सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. ही शांतता कुठल्याही क्षणी कोणतेही वळण घेऊ शकते. सीमेपार पाकिस्तानी सैन्य मोठ्या संख्येने एकत्र येत असले आणि रेंजर्स तेथे तैनात असले तरी, आम्हाला कसलाही फरक पडत नाही! आम्ही कुठल्याही ‘नापाक’ प्रयत्नांना चोख उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत, या शब्दात सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक अरुणकुमार यांनी येथे आपला निर्धार व्यक्त केला.
शहीद जवान गुरनाम सिंग यांना आज बीएसएफतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. अरुणकुमार म्हणाले, शहीद गुरनाम सिंगच्या शौर्याचा आम्हाला अभिमान वाटतो. शहीद गुरनामला सर्वाधिक मानाचा शौर्य पुरस्कार मिळायला हवा. आंतराष्ट्रीय सीमेपलीकडून बीएसएफच्या एकाही जवानाला हात लावण्याचा प्रयत्न झाला वा कुठलीही कुरापत काढण्यात आली, तर पाकिस्तानला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.
आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांना पाकिस्तानचे रेंजर्स मदत करीत आहेत. आमच्याजवळ याचे पक्के पुरावे आहेत. अतिरेक्यांना पाकिस्तानचे रेंजर्स सुरक्षाकवच पुरवीत असल्याचे आम्ही बघितले आहे. एका कारवाईमध्ये भारतीय जवानांच्या गोळीबारात काही रेंजर्स ठार झालेत. त्यानंतर त्यांचे मृतदेह पाकिस्तानच्याच भागातून हलविण्यात आले. तंत्रज्ञानाच्या उपयोगाने आम्ही हा सारा प्रकार बघितला आहे, अशी माहिती यावेळी अरुणकुमार यांनी दिली.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google