Home » ठळक बातम्या, विज्ञानभारत » सुपर कपॅसिटरमुळे स्मार्टफोन, इलेक्ट्रिक क्षेत्रात क्रांती

सुपर कपॅसिटरमुळे स्मार्टफोन, इलेक्ट्रिक क्षेत्रात क्रांती

=अवघ्या काही सेकंदांत होणार चार्जिंग=
वृत्तसंस्था
फ्लोरिडा, २४ नोव्हेंबर
supercapacitorsभारतीय वंशाचे नितीन चौधरी यांनी त्यांच्या अन्य संशोधकांच्या चमूसह तयार केलेल्या सुपरकपॅसिटरमुळे स्मार्टफोनचे चार्जिंग काही सेकंदात होऊ शकणार आहे. फ्लोरिडा विद्यापीठात या संशोधकांच्या चमूने असा कपॅसिटर तयार केला आहे की ज्यामुळे स्मार्टफोन चार्जिंगच नाही तर इलेक्ट्रिक कार क्षेत्रातही क्रांती घडून येईल, असा दावा केला जात आहे.
सध्या असलेल्या सुपरकपॅसिटरच्या तुलनेत हा नवा कपॅसिटर ३० हजार पटीने वेगवान आहे. तो बनविताना नवी प्रक्रिया वापरली गेली आहे व त्यासाठी ‘टूडी मटेरियल’चा वापर केला गेला आहे. अत्यंत सोप्या रासायनिक संयुगांचा वापर केल्याने हा कपॅसिटर अत्यंत उपयुक्त ठरल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या कपॅसिटरवर फोन चार्ज केला की पुन्हा आठवडाभर तो चार्ज करण्याची गरज राहात नाही. अन्य संशोधकांनी यापूर्वी ग्रेफीन व टूडी मटेरियलचा वापर करून असे कपॅसिटर बनविले होते. मात्र, त्यांना मर्यादित यश मिळाले होते अशी माहिती आहे.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ठळक बातम्या, विज्ञानभारत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google