Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे नायडूंकडून स्वागत

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे नायडूंकडून स्वागत

=लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढेल=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –
venkaiah-naidu4देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू करण्यापूर्वी राष्ट्रध्वजासह राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केले. यामुळे नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना वाढीस लागेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
हा अतिशय चांगला निर्णय आहे. आजच्या युवा पिढीच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्याची गरज आहे. या निर्णयामुळे मी स्वत: खुश आहे, असे माहिती व प्रसारण मंत्रालयाचा पदभार सांभाळणारे नायडू यांनी सांगितले.
भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनीही हा निर्णय राष्ट्रवादाची भावना अधिक बळकट करणारा असल्याचे म्हटले आहे. एक भारत-श्रेष्ठ भारत ही संकल्पनाही आता मजबूत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपा या निर्णयाचे स्वागत करते. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजामुळेच आपल्या सर्वांना एक राष्ट्र म्हणून बांधले आहे. एकात्मतेची भावना आणखी वाढणार आहे, असे शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google