Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सुषमा स्वराज यांच्या दोन्ही किडन्या निकामी

सुषमा स्वराज यांच्या दोन्ही किडन्या निकामी

=एम्समध्ये भरती, डायलिसिसवर=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर –
sushma-swaraj-afpपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून, किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्यावर अ. भा. आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये काही चाचण्या करण्यात येत आहेत.
स्वत: सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे आपल्या प्रकृतीबाबतची ताजी माहिती दिली आहे. ‘दोन्ही किडन्या निकामी झाल्याने मी एम्समध्ये भरती झाले आहे. सध्या मी डायलिसिसवर आहे. किडनी प्रत्यारोपणसंदर्भात माझ्यावर काही चाचण्या सुरू आहेत. भगवान श्रीकृष्णाची माझ्यावर कृपा आहे,’ असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
स्वराज यांच्यावर एक आठवड्यापासून एम्समध्ये उपचार सुरू आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन आज बुधवारपासून सुरू झाले असल्यामुळे सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीबद्दल विचारण्यात येत होते. त्यावर स्वत: सुषमा स्वराज यांनीच ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google