Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » सैतानाने बायबलचा दाखला देण्यासारखा हा प्रकार

सैतानाने बायबलचा दाखला देण्यासारखा हा प्रकार

=भाजपाचा पलटवार=
venkaiah-naidu4नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – देशावर आणिबाणी लादणार्‍या आणि अनेकदा विरोधकांची सत्ता असलेली राज्य सरकारे बरखास्त करणारा कॉंगे्रस पक्षच आहे आणि आता या पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांचा आवाज दाबण्याचा आरोप करीत आहेत. सैतानाने बायबलचा दाखला देण्यासारखाच हा प्रकार आहे, असा पलटवार भाजपाने आज केला.
लोकशाही तत्त्वासारख्या मुद्यांवर बोलण्याचा किंवा भाष्य करण्याचा नैतिक अधिकार कॉंगे्रसला नाहीच. कारण, स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी देशावर आणिबाणी लादणारा आणि अनेकदा राज्यघटनेतील कलम ३५६ चा वापर करून राज्य सरकारे बरखास्त करणारा हाच पक्ष आहे. विरोधकांचा आवाज दडपणारे तुम्ही कॉंगे्रसवालेच आहात आणि घटनात्मक संस्थांच्या मूल्यांचा र्‍हास करणारेही तुम्हीच आहात, असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी केला.
एनडीटीव्हीच्या हिंदी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण एक दिवसासाठी बंद ठेवण्याच्या आमच्या सरकारच्या आदेशावर राहुल गांधी टीका करीत आहेत. मोदी सरकारने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात केला असल्याचा आरोप करीत आहेत. पण, संपुआ सरकारच्या काळात ‘मिडनाईट मसाला’ दाखवणार्‍या २१ वाहिन्यांवर बंदी घातली होती, याचा विसर त्यांना पडला असल्याचेच दिसत आहे, याकडे लक्ष वेधताना, मोदी सरकारने एनडीटीव्हीवर घातलेली बंदी ही राष्ट्रीय हिताला अनुसरून आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google