Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सोमवारी मध्यरात्रीपर्यंत वापरा जुन्या नोटा

सोमवारी मध्यरात्रीपर्यंत वापरा जुन्या नोटा

⇒७२ तासांची मुदतवाढ;
⇒रुग्णालये, वीज बिल, पेट्रोल पंप,
⇒शासकीय कर भरण्यासाठी जुन्या नोटा घेतल्या जाणार,
nitin-gadkari-during-a-press-conferenceहिंदुस्थान समाचार,
नवी दिल्ली, [दि. ११ नोव्हेंबर] – ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे. पुढील ७२ तास म्हणजेच १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत रुग्णालये, वीजबिल, पेट्रोल पंप, शासकीय कार्यालयांतील कर आणि सार्वजनिक सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. देशातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच ट्विट करून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफीची मुदत १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर काही वेळातच केंद्र सरकारने सार्वजनिक सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, नागरिकांना वीजबिल, शासकीय कार्यालयांतील कर, रुग्णालयातील बिल, रेल्वे तिकीट, विमानाची तिकिटे आणि पेट्रोल पंपांवर जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा देता येणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्यानंतर ९ नोव्हेंबरपासून अनेक ठिकाणी नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या निर्णयावरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले होते. नोटा बदलण्याच्या आणि जमा करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
या सर्वाचा विचार करून केंद्र सरकारने सार्वजनिक सेवांसाठी जुन्या नोटांच्या वापराची मुदत वाढवली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google