Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » स्टेट बँक एटीएममध्ये लवकरच २०, ५० च्या नोटा

स्टेट बँक एटीएममध्ये लवकरच २०, ५० च्या नोटा

=अरुंधती भट्टाचार्य यांचे संकेत=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर –

Chairperson of State Bank of India (SBI), Arundhati Bhattacharya attends the Finance Minister's meeting with Chief Executives of Public Sector bank and Financial Institutions in New Delhi on October 22, 2013.   The meeting is to take stock of non-performing assets, credit growth and financial performance, include reviewing ways to cut down deteriorating asset quality, credit growth in the targeted sectors.  AFP PHOTO/RAVEENDRAN.        (Photo credit should read RAVEENDRAN/AFP/Getty Images)

सध्या मोठा चलनी नोटा बंद झाल्या असताना आणि लहान मूल्यांच्या नोटांची टंचाई असताना, स्टेट बँक ऑफ इंडियाने मात्र आपल्या ग्राहकांना दिलासा देणारे संकेत दिले आहेत. स्टेट बँकेच्या एटीएममधून लवकरच २० आणि ५० रुपयांच्या नोटा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली.
नागरिकांची तातडीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या आपल्या सर्व एटीएममध्ये १०० आणि त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा उपलब्ध करीत आहोत. ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने बँकांमध्ये गर्दी आहे. ही स्थिती सुरळीत झाल्यानंतर ग्राहकांच्या सोयीसाठी २० आणि ५० रुपयांच्या नोटाही एसबीआयच्या एटीएममध्ये उपलब्ध करून दिल्या जातील, असे अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले.
एटीएममध्ये २० आणि ५० रुपयांच्या नोटा उपलब्ध झाल्यास लोकांना लहान रकमेचे व्यवहार करणे सोईस्कर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अरुंधती भट्टाचार्य यांच्या माहितीनंतर एसबीआय आपल्या एटीएममध्ये २० आणि ५०च्या नोटा कधी उपलब्ध करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 16 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google