Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » स्वत:च्या उद्योग-व्यापार साम्राज्यापासून दूर राहणार: ट्रम्प

स्वत:च्या उद्योग-व्यापार साम्राज्यापासून दूर राहणार: ट्रम्प

=कर्तव्य आणि हितसंबंधातील संघर्ष टाळण्यासाठी निर्णय=
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १ डिसेंबर –
donald_trumpजगभर पसरलेल्या उद्योग आणि व्यवसायाच्या विशाल साम्राज्यापासून आपण पूर्णपणे दूर राहू, असे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. २० जानेवारी २०१७ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपण आपल्या उद्योग-व्यापारापासून स्वत:ला दूर ठेवणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले आहे.
अमाप संपत्ती असलेले ट्रम्प हे अमेरिकेतील मोठे उद्योगपती आहेत. त्यांचे व्यापारविषयक साम्राज्य अमेरिकेबाहेरही आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यावरही ते या साम्राज्याची सूत्रे स्वत:कडे ठेवणार की त्यापासून दूर राहणार, याबाबत विविध तर्कवितर्क केले जात होते.
ट्रम्प हे व्यापार क्षेत्रात कायम राहिले तर, राष्ट्राध्यक्षपदाची कर्तव्ये आणि व्यावसायिक हितसंबंध यामुळे त्यांच्यावर निशाणा साधला जाऊ शकत होता. नैतिक कारणांसाठी ट्रम्प यांनी त्यांच्या खासगी उद्योगांत राहू नये, यासाठीही दबाव वाढलेला होता.
टीकाकारांची तोंडे बंद करण्यासाठी ट्रम्प यांनी टि्‌वट करून आपला निर्णय थोडक्यात जाहीर केला. अमेरिकेला पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष म्हणूनच मला काम करावे लागणार आहे. त्यासाठी उद्योग आणि व्यवसायांच्या व्यापातून मला पूर्ण दूर राहावे लागणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
वास्तविक, राष्ट्राध्यक्षाने त्याच्या खासगी उद्योग-व्यवसायातून दूर राहण्याचे कायदेशीर बंधन नाही. परंतु राष्ट्राध्यक्षपदाची कर्तव्ये आणि खासगी हितसंबंध यांच्यात संघर्ष नाही हे नागरिकांना दिसले पाहिजे. त्यासाठीच व्यवसायांतून पूर्णपणे दूर ठेवण्यास आवश्यक असलेली कायदेशीर कागदपत्रे सध्या तयार करण्यात येत आहेत, असेही ट्रम्प यांनी आपल्या टि्‌‌वटमध्ये म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google